भारत, फेब्रुवारी 18 -- Vijaya Ekadashi २०२५: विजया एकादशीचे व्रत भगवान श्री हरि विष्णू यांना समर्पित आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी विजया एकादशी साजरी केली जाते. फेब्रुवारी महिन्यात सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी विजया एकदशी आहे. या दिवशी पूर्ण भक्तीभावाने भगवान विष्णूची पूजा केल्यास पापांपासून मुक्ती मिळू शकते अशी मान्यता आहे. विजया एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. त्या बरोबरच जीवनात सुख-समृद्धी देखील वाढते.

विजया एकादशीच्या दिवशी भगवान हरि विष्णूला पंचामृताने अभिषेक करणे उत्तम असते. असे केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखविण्याच्या नवीन संधीही उपलब्ध होतील.

जर तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला असेल आणि दिवसेंदिवस ...