Mumbai, मार्च 24 -- आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने एक नवा हिरा शोधून काढला आहे. या खेळाडूने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात चाहत्यांची मने जिंकली. त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या तीन तगड्या फलंदाजांची शिकार केली. या गुणी खेळाडचे नाव विघ्नेश पुथूर असे आहे.तो केरळचा रहिवासी आहे.

२३ वर्षीय विघ्नेश पुथूर हा डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज आहे. विघ्नेशने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांच्या विकेट घेतल्या. यानंतर विघ्नेश पुथूर हा चांगलाच चर्चेत आला आहे.

विघ्नेश पुथूर याला मुंबई इंडियन्सने ३० लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले. यात सर्वात विशेष गोष्ट म्हणजे, विघ्नेशने अद्याप केरळच्या वरिष्ठ संघासाठी एकही सामना खेळलेला नाही आणि त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.

विघ्नेश पुथूरने या...