Mumbai, मे 25 -- Vidhan Parishad Election: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यावर राज्यात विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. तर निकाल १ जुलै रोजी लागणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. शुक्रवारी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने या संदर्भात एक पत्र काढून दोन उमेदवारांची नावे घोषित केली आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकी धामधूम सुरू आहे. ४ जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान, ही निवडणूक झाल्यावर राज्यात शिक्षक मतदार संघ आणि विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. या साठी ठाकरे गटाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत आतापासून वाढणा...