Ayodhya, फेब्रुवारी 2 -- MP Awadhesh Prasad suddenly started crying: अयोध्येत दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा नग्न मृतदेह सापडल्यानंतर राजकारण तापलं आहे. समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खासदार अवधेश प्रसाद यांनी याबाबत रविवारी पत्रकार परिषद बोलावली होती. या घटनेवर बोलताना ते अचानक प्रसारमाध्यमांसमोर जोरजोरात रडू लागले. प्रभू श्रीरामाच्या नावाची याचना करताना ते रडू लागले तेव्हा त्यांचे समर्थक त्यांचे सांत्वन करण्यासाठी जमले. 'मुलीसाठी लढा व तिला न्याय मिळवून दया, असे समर्थकांनी सांगितले. यानंतर खासदारांनी लोकसभेत पंतप्रधान मोदींसमोर हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले. दलित मुलीला न्याय मिळाला नाही तर मी राजीनामा देईन, असा इशाराही खासदारांनी दिला.

खासदार रडत म्हणाले, 'दे...