Mumbai, फेब्रुवारी 3 -- Bharat Ganeshpure In Farms : 'चला हवा येऊ द्या', 'फू बाई फू' यासारख्या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे अभिनेते भारत गणेशपुरे सध्या काय करतायत असा प्रश्न त्यांच्या सगळ्याच चाहत्यांला नक्कीच पडला असेल. काही महिन्यांपूर्वी 'चला हवा येऊ द्या' हा शो ऑफ एअर गेला. त्यानंतर या शोमध्ये कलाकार सध्या काय करतायत? त्यांचं काय सुरू आहे? हे जाणून घेण्यासाठी त्यांचे सगळे चाहते उत्सुक असतात. आता अभिनेता भारत गणेशपुरे यांनी स्वतःच एक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना अपडेट दिली आहे. आपल्या धमाल विनोदांनी आणि अभिनयाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारे आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारे अभिनेते भारत गणेशपुरे सध्या त्यांच्या शेतात रमले आहेत.

भारत गणेशपुरे हे सध्या आपल्या गावी शेती करण्यात व्यस्त झाले आ...