Mumbai, फेब्रुवारी 12 -- Arjun Kapoor Viral Video : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी 'मेरे हस्बंड की बीवी' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. चित्रपट रिलीज होण्याआधी तो या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. नुकताच अर्जुन त्याच्या दोन्ही सहकलाकार भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंहसोबत चाहत्यांशी संवाद साधताना दिसला. यावेळी त्याला पाहून कुणीतरी मलायकाचं नाव घेतलं, त्यानंतर अर्जुनला आपण नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हतं. एक्स गर्लफ्रेंडचं नाव ऐकल्यावर अभिनेता चांगलाच गोंधळून गेला होता.

अर्जुन कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात अर्जुन स्टेजवर आहे आणि रकुल, भूमी दोघींसोबत चाहत्यांशी संवाद साधत आहे. यावेळी भूमिला कोणीतरी विचारले की, तिला हा चित्रपट का आवडला आणि करावा वाटला? भूमी काही उत्त...