Mumbai, एप्रिल 11 -- सलमान खानने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. खरं तर 'सिकंदर' रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर लोक त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशातच त्याने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या फिटनेसचा पुरावा दिला आहे. सलमानचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते खूश झाले आहेत. 'टायगर अजून म्हातारा झालेला नाही', यावर त्यांचा विश्वास बसला आहे.

या व्हिडिओमध्ये ५९ वर्षीय अभिनेता पनवेलमधील आपल्या फार्महाऊसवरील एका झाडावर चढून ताजी बेरी तोडताना दिसत आहे. सलमानने व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये 'सिकंदर' हे गाणं ठेवलं आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने सोशल मीडियावर लिहिलं, 'बेरी गुड फॉर यू.

सलमानचा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी त्यांचे टीकाकार आश्चर्यचकित झाले आहेत. वरुण धवन, अनन्या प...