भारत, जानेवारी 26 -- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने एका मुलीला जन्म दिला. तिने मुलीचे नाव दुआ ठेवले. त्यानंतर दीपिकाने फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. आता दीपिका रॅम्प वॉक करताना दिसली. त्याचा वॉक पाहून चाहते आनंदी झाले आहेत. अनेकांनी तर दीपिकाची तुलना सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्याशी केली आहे.

बॉलिवूड फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या ब्रँडला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मुंबईत एक खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये अनेक अभिनेत्रींने रॅम्प वॉक केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दीपिकाचे रॅम्पवॉक करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या इव्हेंटसाठी दीपिकाने लूज क्रीम शर्ट, मॅचिंग ट्राऊझर आणि ट्रेंच कोट परिधान केला होता. तिने स्टनिंग स्टेटमेंट ज्व...