Mumbai, मे 8 -- रोहित शर्माने बुधवारी, ७ मे रोजी संध्याकाळी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून जागतिक क्रिकेटला आश्चर्याचा धक्का दिला. जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात तो टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसेल, असे मानले जात होते, पण त्यापूर्वीच या हिटमॅनने क्रिकेटच्या सर्वात लांब स्वरूपाचा निरोप घेतला. रोहितच्या या निर्णयामुळे लाखो चाहत्यांची मने तुटली. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला. दरम्यान, रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर रडू लागलेल्या एका महिला चाहतीचा व्हिडिओ समोर आला आहे. या मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

रोहित शर्माच्या या चाहत्याचे नाव जिनिया देवनाथ असे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, 'आई रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मला आता बरं वाटत नाही. माझं स्वप्न अपूर्णच राहिल...