MP, फेब्रुवारी 9 -- मध्य प्रदेशातील विदिशामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका कॉन्सर्टमध्ये डान्स करताना अचानक एक तरुणी स्टेजवरच कोसळली. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. तिथे उपस्थित लोकांना काही समजण्याआधीच मुलीचा श्वास थांबला होता. मगधाम रिसॉर्टमध्ये ही घटना घडली. इंदूर येथील परिणीता जैन असे मृत तरुणी नाव आहे.

मृत तरुणी आपल्या चुलत बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी विदिशा येथे आली होती. डान्स फ्लोअरवर नाचत असताना ती बेशुद्ध होऊन स्टेजवर कोसळल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. नृत्य करताना मुलीला हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ती स्टेजवरच पडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

आश्चर्य..! माणसाला लावली डुकराची किडनी, ऑपरेशननंतर रुग्णही ठणठणी...