Delhi, जानेवारी 30 -- US Air plane and Helicopter Crash : अमेरिकेत भीषण विमान अपघात झाला आहे. वॉशिंग्टन डीसीतील रोनाल्ड रेगन राष्ट्रीय विमानतळाजवळ अमेरिकन एअरलाइन्सचे विमान ५३४२ आणि ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरची लँडिंग दरम्यान पहाटे धडक झाली. या घटनेनंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. रोनाल्ड रेगन राष्ट्रीय विमानतळाने बुधवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेत काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
विमान अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. वॉशिंग्टन डीसी अग्निशमन विभागाने या बाबत स्वतंत्रपणे निवेदन काढून याची माहिती दिली आहे. तर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.