Mumbai, जानेवारी 14 -- Share Market News Update : शेअर बाजारात सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणजे टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन आयडिया. आज पुन्हा एकदा ती चर्चेत आहे. कंपनीचा शेअर आज ५ टक्क्यांहून अधिक वधारला असून तो ८.१४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
व्हीआयचा शेअर सोमवारी ७.७४ रुपयांवर बंद झाला होता. शेअर्सच्या आजच्या वाढीमागे एक मोठं कारण आहे. वास्तविक, कंपनीनं निर्गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ओमेगा टेलिकॉम होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडनं व्होडाफोन आयडियाच्या प्रेफरेन्शियल इश्यूद्वारे १०,८४,५९४,६०७ इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. उषा मार्टिन टेलिमॅटिक्स लिमिटेडनं (UMTL) प्रेफरेन्शियल इश्यूद्वारे ६०८,६२३,७५४ अतिरिक्त इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. या व्यवहाराचे पडसाद शेअर बाजारात उमटल्याचं मानलं जात ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.