Mumbai, फेब्रुवारी 13 -- Vodafone Idea : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेली घसरण थांबून व्होडाफोन आयडियाचा शेअर आज तब्बल ६ टक्क्यांहून अधिक उसळला. बीएसईवर हा शेअर ६.८९ टक्क्यांनी वधारून ८.९९ रुपयांवर पोहोचला. दूरसंचार विभागानं ६,००० कोटी रुपयांची बँक गॅरंटी मागितल्याच्या वृत्तानंतरही व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे.

सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं 'मनी कंट्रोल'नं दिलेल्या वृत्तानुसार, दूरसंचार विभागानं व्होडाफोन आयडियाला १० मार्चपर्यंत ६,०९० कोटी रुपयांची बँक गॅरंटी देण्याचे निर्देश दिले आहेत. ही बँक गॅरंटी २०१५ नंतर खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी एकरकमी देयकाची तूट भरून काढण्यासाठी आहे, असं वृत्त आहे.

सरकारनं आदित्य बिर्ला समूहाच्या टेलिकॉम ऑपरेटरला पूर्ण बँक गॅरंटी देण्याऐवजी ५,४९३ कोटी रुपयांचं रोख पेमेंट करण्याचा पर्याय...