Mumbai, फेब्रुवारी 4 -- Vodafone Idea Share Price : दूरसंचार क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये आज तेजी दिसत आहे. एजीआर थकबाकीबाबत अर्थ सचिवांनी केलेल्या वक्तव्यानंतर शेअरमध्ये ही वाढ झाली आहे. व्होडाफोन आयडियाचा शेअर मंगळवारी, ४ फेब्रुवारी रोजी ९.२९ रुपयांवर खुला झाला आणि ९.६१ रुपयांवर पोहोचला.

सकाळी ११.४० वाजता व्हीआयचे शेअर ३.४२ टक्क्यांनी वधारून ९.३८ रुपयांवर व्यवहार करत होते. व्होडाफोन आयडियाचा सध्याचा थकीत एजीआर सुमारे ८०,००० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी व्होडाफोन आयडियाचा शेअर १० टक्क्यांनी वधारला. दिवसअखेर तो ७ टक्क्यांनी वधारून बंद झाला. सोमवारी हा शेअर ९.०८ रुपयांवर बंद झाला. मात्र अजूनही हा शेअर ११ रुपयांच्या एफपीओ मूल्यापेक्षा ५० टक्के आणि २०२४ च्या उच्चांकी १९.१८ रुप...