Mumbai, फेब्रुवारी 22 -- Vastu Tips: वास्तूशास्त्रात जीवनाच्या सुख-समृद्धीसाठी आपल्या दिनक्रमातील काही छोट्या छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुनुसार अनेकदा आपण कळत-नकळत किंवा सवयीने अथवा सोय-गैरसोयीमुळे काही गोष्टी आपल्या खिशात ठेवतो. असे केल्याने त्या काळासाठी आपली सोय होत असते. मात्र या वस्तू खिशात ठेवल्याने त्या व्यक्तीवर अशुभ परिणाम होतो असे वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहे. तर दुसरीकडे काही गोष्टी खिशात ठेवल्याने धन आणि समृद्धी येते. असं म्हटलं जातं की, खिशात अनेक गोष्टी एकत्र ठेवल्यास नकारात्मकता वाढू शकते. ज्याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर आणि करिअरवर होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या, खिशात कोणत्या गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे?

वास्तुनुसार कधीही फाटलेले पाकीट किंवा पर्स खिशात ठेवू नये. यामुळे नक...