Mumbai, जानेवारी 31 -- Vasant Panchami Shubhechha : धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्माजीच्या मुखातून बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वती प्रकट झाली आणि या दिवशी ब्रह्मांडाला आवाजही प्राप्त झाला. हा खास दिवस म्हणजे सरस्वती पूजनाचा म्हणजेच वसंत पंचमीचा होय.

दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो. यावेळी ही शुभ तारीख रविवार २ फेब्रुवारी रोजी आहे. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने आणि मंत्रांचा जप केल्याने ज्ञान आणि संपत्ती मिळते. तसेच या दिवशी वसंत ऋतु सुरू होतो. वसंत ऋतूच्या प्रारंभात आणि सरस्वती देवीच्या स्मरणात या दिवसाला आणखी खास करण्यासाठी तुमच्या प्रियजनांना वसंत पंचमीच्या या शुभेच्छा पाठवा.

ज्ञानरूपी प्रकाशातून अंधकार दूर होवो,

हीच आजच्या दिवशी कामना आणि सरस्वतीदेवी चरणी प्रा...