Mumbai, जानेवारी 29 -- Vasant Panchami In Marathi : हिंदू धर्मात माघ महिन्याला सणांचा महिना म्हणतात, कारण या महिन्यात माघी गणेश जयंती, गुप्त नवरात्री असे मोठे सण साजरे केले जातात. या काळात, वसंत पंचमीचा सण देखील याच महिन्यात येतो, जो संगीताची देवी सरस्वतीच्या पूजेला समर्पित आहे.

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी सरस्वती पूजन म्हणजेच वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. यंदा वसंत पंचमीबाबत संभ्रम आहे. यावर्षी पंचमी तिथी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजून १४ मिनिटांनी सुरू होत असून ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत चालणार आहे. उदया तिथीनुसार वसंत पंचमी २ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. देशाच्या काही भागात २ फेब्रुवारीला तर काही भागात ३ फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे.

वसं...