Mumbai, फेब्रुवारी 19 -- Varun Dhawan-Natasha Dalal Pregnant: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री नताशा दलाल यांच्या लग्नाला आता बराच काळ लोटला आहे. दोघेही बी-टाऊनचे खूप लोकप्रिय कपल आहेत. गेल्या काही दिवसांपासून वरुण आणि नताशा चाहत्यांना गुडन्यूज देणार अशी चर्चा सुरू होत्या. अखेर आता अभिनेत्याने चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी आपण आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे.

आता अभिनेता वरुण धवन याची नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. वरुणचे चाहते ज्या दिवसाची वाट बघत होते, तो दिवस अखेर आला आहे. आता वरुण धवनने नताशा दलालच्या प्रेग्नन्सीची अधिकृत घोषणा केली आहे. आता या जोडप्याच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे. य...