भारत, एप्रिल 17 -- Kashmir Vande Bharat : जम्मूतील कटरा ते श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवला जाणार होता, पण पंतप्रधान मोदींचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याने त्याला थोडा अधिक विलंब लागू शकतो. मात्र, या आठवड्यापासून या गाडीचे तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) वंदे भारत कोच तयार करण्यात आले आहेत. यामुळे देशभरातून काश्मीरचा प्रवास सोपा होणार आहे. मात्र, प्रवाशांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आधी रेल्वेने जम्मूतील कटरा येथे अन्य ट्रेनने यावे लागेल आणि त्यानंतर येथून श्रीनगरला वंदे भारत ट्रेन पकडावी लागेल. जम्मू-काश्मीरमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये इतर गाड्यांप्रमाणेच पाच वर्षांखालील मुलांना कोणतेही तिकीट असणार नाही.

श्रीनगरला धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे भाडे आणि व...