भारत, एप्रिल 17 -- UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा(मुख्य) परीक्षा २०२३ (UPSC CSE 2023)चाअंतिम निकाल (Upsc result) मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील सहा जणांनी यश मिळवले आहे. यामध्ये कदमवाडीतील फरहान इरफान जमादार (Farhan Irfan jamadar) याने १९१ वी रँकमिळवून आयएएस पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या यशाचे मुस्लिम तरुणांसमोर एक आदर्श घालून दिला आहे.

फरहानच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. मात्र याचा कधीही बाऊ न करता त्याने अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले. तो अजूनही सायकलनेच प्रवास करतो व या सायकलनेच त्याच्या आयुष्याला गती दिली. सायकलवरून सुरू झालेला त्याचा प्रवास थेट आयएएस पदावरून घेऊन गेला आहे.

UPSC Success Story : वडील हातगाडीवर विकतात भाजी; मुलगी बनली गावातील पहिली IAS अधिकारी, डोळ्या...