Mumbai, फेब्रुवारी 6 -- Smartphones News: यावर्षी वनप्लस १३ सीरिज तसेच सॅमसंग गॅलेक्सी एस २५ सीरिजसह अनेक स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. यातच फेब्रुवारी महिन्यात विवो, रियलमी, आयक्यूओ आणि इतर ब्रँडसह अनेक स्मार्टफोन लाँच होणार आहेत. या आगामी फोनबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

आयक्यूओओ परफॉर्मन्स-सेंट्रिक फोन बनवण्यासाठी ओळखला जातो आणि हा फोन मिड-रेंज कॅटेगरीमध्ये येणारा याला अपवाद ठरणार नाही. स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ असण्याची शक्यता असलेल्या चिपसेटसह फोनबद्दल बरीच माहिती यापूर्वीच कंपनीने सांगितली आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की, या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. त्यापैकी एक कॅमेरा ५० एमपी सोनी आयएमएक्स ६०० सेन्सर आणि ८ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स असू शकतो. लीक आणि रिपोर्ट्सनुसार हा फोन भारतीय बाजारपेठेत सुमारे ३० हजार रुपयांना दाखल होऊ शकतो...