Mumbai, फेब्रुवारी 4 -- Unknown Facts About Stale Food : अन्न नेहमी जेवढं खाल्लं जाईल, तितकंच शिजवाव, असं म्हटलं जातं. आयुर्वेद असो वा आधुनिक विज्ञान, अन्न नेहमी ताजे आणि लगेच शिजवून खावे, यावर दोघांचेही एकमत आहे. शिळे अन्न फ्रिजमध्ये ठेवून किंवा पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्वे ही कमी होतात आणि चव खराब होते. मात्र, काही खाद्यपदार्थ असे असतात, जे शिळे झाल्यानंतर अधिकच चविष्ट आणि पौष्टिक होतात. यातील अनेक पदार्थ खास शिळे शिल्लक राहिलेल्या पदार्थांपासून बनवले जातात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. चला तर मग आज जाणून घेऊया अशा पदार्थांबद्दल...

अनेकदा घरातील मोठ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी चहाबरोबर रात्रीची उरलेली पोळी खायला आवडते. जर तुमच्याकडेही पोळीही रात्री शिल्लक राहिली असेल, तर ती गरम करून खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. शिळ्या चपातीम...