Mumbai, फेब्रुवारी 10 -- Unknown Facts About Cat Bite : कुत्रा चावल्याने रेबीजसारखे गंभीर आजार होतात, ज्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते. अन्यथा, ते व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. मात्र, कुत्राच नाही तर, मांजरीच्या चाव्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर म्हणतात की, कुत्रा चावल्याप्रमाणे मांजर चावल्यास देखील त्वरित उपचार घेतले पाहिजेत. मग, ती जंगली मांजर असो किंवा घरात पाळलेली मांजर, उपचार हे आवश्यक आहेत. कोणताही प्राणी चवल्यास हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन घ्यायलाच हवे.

एका रिपोर्टनुसार डॉक्टर म्हणतात की, कुत्रा चावल्यास रेबीजचे इंजेक्शन दिले जातात जेणेकरून संसर्ग पसरू नये. यासाठी सर्व रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीला मांजर चावली असेल, तर त्याने देखील ताबडतोब उ...