Mumbai, फेब्रुवारी 5 -- Unknown Facts About Kitchen : आपल्या स्वयंपाक घरात असे अनेक मसाले असतात, जे वर्षानुवर्षे डब्यात बंद राहिले तरीही ते खराब होत नाहीत. त्यांना कधीच एक्सपायरी डेट नसते. अशा गोष्टी तुम्ही सहज कोणतही टेंशन न घेता वापरू शकता. जर, तुम्ही देखील काही गोष्टी खराब झाल्या असे समजून फेकून देत असाल, तर थांबा आणि आधी 'या' गोष्टी जाणून घ्या.

तुम्हाला माहिती आहे का की, तांदळाला कधीच एक्सपायरी डेट नसते? ते खराब होण्यापासून रोखण्यासाठी, तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. तांदूळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरावा. तांदळाला ओलावा लागण्यापासून दूर ठेवा. सुके तांदूळ तुम्ही वर्षानुवर्षे सहज वापरू शकता.

साखर आणि मीठ देखील वर्षानुवर्षे वापरले जाऊ शकतात. कारण, या दोन्ही गोष्टी खराब होत नाहीत. या दोन्ही गोष्टी खराब होऊ नयेत म्हणून,...