New delhi, फेब्रुवारी 1 -- Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरातून सूट देऊन आणि टॅक्स स्लॅबमध्ये बदल करून मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला आहे. यामुळे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वार्षिक १२ लाख रुपये कमावणाऱ्यांचे एकूण ८०,००० रुपये वाचतील, तर ज्यांचे उत्पन्न २४ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना १,१०,००० रुपयांची बचत होईल. पगारदार व्यक्तींसाठी स्टँडर्ड डिडक्शन ७५,००० रुपये असल्यास १२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जाणार नाही.

अर्थसंकल्पातील प्रस्तावित टॅक्स स्लॅबनुसार १२ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास ४ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही, ४ लाख ते ८ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५ टक्के, ८ ते १२...