Mumbai, फेब्रुवारी 1 -- Budget 2025 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात कॅन्सरसह ३६ जीवनरक्षक औषधांना मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आल्याची घोषणा केली. यामुळे कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय २०२५ च्या भाषणात ३६ जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द केला जाणार असल्याची घोषणा केली. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कर्करोग डे केअर सेंटर बांधले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. कर्करोग उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधे स्वस्त होतील. ६ जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५ टक्के कमी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अर्थमंत्री सीतारामन यांनी डेकेअर कॅन्सर सेंटरची घो...