Mumbai, फेब्रुवारी 1 -- Stocks in Focus Before Budget : आर्थिक वर्ष २०२५-२६ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन वैयक्तिक करात कपातीची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे. तसं झाल्यास काही कंपन्यांच्या शेअर्सवर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

रेलिगेअर ब्रोकिंगचे रवी सिंग यांनीही याबाबत विश्वास व्यक्त केल्याचं 'आज तक'च्या वृत्तात म्हटलं आहे. २०२५ च्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील वाढीव खर्च, कर सवलत आणि रोजगार निर्मिती उपक्रमांसह अनेक उपाययोजनांद्वारे उपभोगास चालना दिली जाण्याची शक्यता आहे. करात सूट देण्यापासून ते शेतीसाठी सबसिडी आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवण्यापर्यंतच्या घोषणा होऊ शकतात. अशा स्थितीत काही शेअर्...