New delhi, जानेवारी 27 -- What Is Halwa Ceremony : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पारंपारिक हलवा सोहळ्यात भाग घेतला. त्यामुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हलवा समारंभानंतर अर्थमंत्र्यांनी बजेट प्रेसला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, वित्त सचिव तुहिन कांता पांडे यांच्यासह आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये हा सोहळा पार पडतो. तिथेच प्रिंटिंग प्रेस आहे. अर्थ मंत्रालय नॉर्थ ब्लॉकमध्ये आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाणार आहे. हलवा सोहळा हा अर्थसंकल्पीय दस्तऐवज अंतिम करण्याची श...