देहराडून, जानेवारी 27 -- Uttarakhand Uniform Civil Code : समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. यूसीसी किंवा समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये अनेक नियम बदलणार आहेत. लग्न, घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिपपासून उत्तराधिकार निवडीपर्यंत बरेच काही बदलणार आहे. उत्तराखंडमध्ये हा कायदा सर्वधर्माच्या नागरिकांना लागू होणार आहे. आतापर्यंत विवाह, घटस्फोट आणि इच्छापत्र यासारख्या प्रकरणांमध्ये पर्सनल लॉचे वेगवेगळे नियम लागू होते.

डोंगराळ भागातील राज्य असलेल्या उत्तराखंड सरकार राज्यात समान नागरी कायदा आज पासून लागू होणार आहे. समान नागरी कायद्यासंदर्भातील नियमांबाबत सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा कायदा लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याची लकवरच अंमलबजावणी क...