भारत, फेब्रुवारी 14 -- सध्या विविध शहरांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अशावेळी वाहतूक कोंडीत अडकून राहण्यापेक्षा कमी अंतरावर जाण्या-येण्यासाठी दुचाकी वाहन वापरणे योग्य. शिवाय विकेंडच्या दिवशी राइड करण्यासाठी दुचाकी योग्य वाहन असते. त्यामुळे तुम्ही दुचाकी वाहन खरेदी करण्याची योजना आखत असाल आणि तुमच्याकडे पैशांची कमतरता असल्यास बँकेतून पर्सनल लोन किंवा दुचाकी खरेदीसाठी मिळणारे कर्ज घेऊ शकतो. मात्र तुमची आर्थिक स्थिती आणि गरज लक्षात घेता या दोन कर्जप्रकारामध्ये काय फरक आहे, ते आपण जाणून घेणार आहोत.

पर्सनल लोनचे अनेक फायदे असतात. तुमच्या घरी एखादी वैद्यकीय मेडिकल इमर्जंसी उदभवल्यास, एखादे कर्ज फेडायचे झाल्यास, घराची डागडुजी, प्रवास आणि दुचाकी खरेदी इत्यादी कामांसाठी पर्सनल लोनचा वापर करता येते. कर्जदार तीन वेगवेगळ्या तारणांद्वारे पर्सनल ...