Mumbai, मे 8 -- Turmeric Tea Benefits: वजन कमी करण्यासाठी आणि आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अनेकदा यासाठी काही लोक सकाळी लिंबू पाणी, पाण्यात मध किंवा हळद टाकून पिण्याचा सल्ला देतात.हळद ही शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या हळदीचा चहा बनवून प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. वजनासोबतच हळद रोगप्रतिकारक शक्तीसाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळे वजन तर नियंत्रणात राहिलच पण अनेक आजार देखील दूर राहतील. चला तर जाणून घेऊया हळदीचा चहा पिण्याचे बहुमुल्य फायदे...

वजन कमी करणे हे खूप अवघड काम आहे. पण, योग्य आहार आणि व्यायामाने तुम्ही लठ्ठपणा झपाट्याने कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही हळदीचा चहा घेऊ शकता. असे अनेक गुणधर्म हळदीमध्ये आढळतात, ज्यामुळे तुमचा मंदावलेला चयापचय वेगाने वाढतो. हळद श...