Mumbai, फेब्रुवारी 24 -- आज चंद्र गोचर अनुकूल राहील. मनाविरुद्ध काही घडलं तरी सकारात्मक विचारामुळं उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात याचा फायदा होईल. व्यावसायिकांना आर्थिक लाभ संभवतो. दूरवरच्या प्रवासाचा योग आहे. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. जुन्या मित्राची भेट होईल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. उत्साह न गमावता जोमानं, चिकाटीनं प्रयत्न करावा. परिस्थितीवर मात कराल. अपेक्षित यश मिळेल. अर्थिक व्यवहार करताना तात्पुरत्या फायद्याकडं लक्ष देऊ नका. दूरचा विचार करा. मुलांकडून अनेक चांगल्या आणि आनंददायक बातम्या मिळतील. शुभ रंग: राखाडी शुभ दिशा: आग्नेय. शुभ अंकः ०२, ०७.

चंद्रबल शुभ आहे. त्यामुळं सर्व काही सुरळीत होण्याचा दिवस आहे. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. हजरजबाबी स्वभावा...