Mumbai, फेब्रुवारी 1 -- Rajasthan Travel Places : प्राचीन इमारती, राजेशाही राजवाडे आणि शाही घरे यासाठी प्रसिद्ध असलेले राजस्थान हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समृद्ध इतिहासाचे प्रतीक असलेले राजस्थानचे भव्य राजवाडे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत. पण, ही ठिकाणे जितकी सुंदर आहेत, तितकीच ती झपाटलेली असल्याचे देखील म्हटले जाते. जर तुम्ही देखील राजस्थानमध्ये फिरायला जायचा विचार करत असाल, तर तुम्ही या चर्चित ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.

आपल्या भितीदायक इतिहासासाठी प्रसिद्ध असलेला भानगढ किल्ला केवळ राजस्थानच नव्हे तर संपूर्ण भारतातील भीतीदायक ठिकाणांमध्ये गणला जातो. या जागेची एक रंजक कथा आहे. असं म्हटलं जात की, येथील एक तांत्रिक राजकन्येच्या प्रेमात पडला. तांत्रिकाला काळी जादू करून राजकुमारीला मिळवायचे होते. मात्र, जेव्हा राजकन्येला ...