Mumbai, जानेवारी 27 -- Cities Name After Demon : आपल्या देशातील अनेक शहरांची नावे देव, देवी, पीर-फकीर, राजे, महाराज आणि नवाबांच्या नावावर आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का की, काही शहरांची नावे राक्षसांच्या नावावर देखील आहेत. कदाचित हे वाचून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल. पण, हे खरे आहे की, भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अशी अनेक शहरे आहेत, ज्यांची नावे कोणत्या ना कोणत्या राक्षसाच्या नावावर ठेवण्यात आली आहेत.

दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात म्हैसूर नावाचे एक अतिशय लोकप्रिय शहर आहे. हे महिषासुर या राक्षसाच्या नावाशी संबंधित आहे. म्हैसूर हे महिषासुराचे शहर म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की, महिषासुराच्या काळात या शहराला महिषा-उरू असे म्हटले जात होते. त्यानंतर कन्नड भाषेत महिशुरू आणि शेवटी म्हैसूरू किंवा म्हैस...