Mumbai, फेब्रुवारी 6 -- Must Visit Places In Goa : गोवा हे राज्य प्रसिद्ध पर्यटन स्थळांसाठी, नितळ समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक मंदिरे, चर्च आणि अनेक नयनरम्य प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. गोव्यातील नाईटलाईफने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. जर, तुम्ही गोव्यात फिरायला येण्याचा विचार करत असाल, तर या आकर्षक पर्यटन स्थळांना नक्कीच भेट द्या...

भारतातील गोवा हे राज्य केवळ चर्च आणि समुद्रकिनाऱ्यांसाठीच नाही, तर त्याच्या प्राचीन मंदिरांसाठी देखील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. गोव्यातील मार्डोल येथील फोंडा येथे असलेले असेच एक ऐतिहासिक मंदिर म्हणजे म्हाळसा देवी मंदिर. हे प्राचीन मंदिर भगवान विष्णूचा स्त्री अवतार देवी म्हाळसा यांना समर्पित आहे आणि हिंदूंसाठी एक पवित्र स्थान आहे. हे भारतातील एक दुर्मिळ मंदिर आहे, जिथे भगवान विष्णूची पूजा नर आणि म...