Mumbai, फेब्रुवारी 2 -- Foreign Travel Trips : बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडते. आपल्या व्यस्त कामातून थोडासा वेळ काढून कुठेतरी बाहेर जाऊन येणं आणि रीलॅक्स होणं अनेकांना आवडतं. जेव्हा अशा लोकांना आपल्या कामातून मोकळा किलतो, तेव्हा ते प्रवासासाठी बाहेर पडतात. काही वेळा मोठी सुट्टी मिळाली की, लोक परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन देखील करतात. जर तुम्हालाही परदेश प्रवासाची आवड असेल, आणि एखादा देश शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या देशांबद्दल सांगणार आहोत. इथे फिरायला जाताना तुम्हाला तुमचं बजेट देखील मोठं ठेवावं लागणार आहे. या देशात केवळ चहा-कॉफी प्यायल्याने देखील तुमचे बजेट बिघडू शकते. म्हणूनच, जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल आणि या देशांची नावे तुमच्या यादीत असतील तर, आधीच तुमचे बजेट थोडे वाढवा....