Mumbai, फेब्रुवारी 5 -- Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी युक्रेनच्या एका अभिनेत्याला मालाडमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे बनावट जन्मदाखला होता आणि त्याआधारे त्याने भारतीय असल्याचा दावा केला होता', अशी माहिती मुंबई पोलिसांनी मुंबई सत्र न्यायालयात दिली आहे.

टोरेस ज्वेलरी गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी चित्रपट निर्माते असल्याचे भासवून पोलिसांनी मुंबईत भारतीय चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या एका युक्रेनियन अभिनेत्याला अटक केली आहे. अर्मेन अतायन असे या अभिनेत्याचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री उशिरा त्याला अटक केली.

२६ जानेवारी रोजी लोणावळा येथे तौसिफ रियाजला अटक केल्यानंतर अतायनचे नाव पुढे आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. रियाज ऊर्फ जॉन कार्टर...