Mumbai, एप्रिल 12 -- दैनंदिन राशीभविष्यानुसार आजचा (१२ एप्रल) दिवस शुक्रवार सर्व राशींसाठी खूप महत्वाचा असणार आहे. आज काही राशींना आर्थिक क्षेत्रात लाभ मिळेल. तर काही राशीच्या लोकांनी व्यवसाय क्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. पण येते आपण आज कोणत्या राशींसाठी भाग्याचा दिवस आहे, ते जाणून घेणार आहोत.

Rashi Bhavishya : विनायक चतुर्थीचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

मेषः आज चंद्राच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमण विशेष लाभदायक ठरणार आहे. तुमच्यासमोर शत्रूंचे काही चालणार नाही. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. इतरांना सल्ले देण्यात आणि इतरांच्या वर्तनात कशी सुधारणा हवी हे समजवण्यात पुढे रहाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहिल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्त...