Mumbai, मे 9 -- आज चंद्रदर्शनचा योग आहे. तसेच चंद्र गुरुशी संयोग करत असून गजकेसरी योग घटित होत आहे. आजच्या दिवसावर गुरुचा प्रभाव राहणार आहे. त्यासोबतच चंद्र वृषभ राशीतून संक्रमण करणार आहे. त्यामुळे शोभन योग तयार होत आहे. आज बालव करणात गुरुवारचा दिवस १२ राशीसाठी कशा स्वरुपाचा असणार आहे ते जाणून घेऊया.

आज गुरुवारचा दिवस मेष राशीसाठी उत्तम असणार आहे.आज गुरू आणि चंद्राचा योग जुळून येत असून आर्थिक बाबतीत खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. गुरूबल लाभल्याने भाग्याची साथ चांगली मिळेल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच्या मार्गावर राहतील. इतरांसमोर तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. दूरच्या प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची संधी ...