Mumbai, मे 4 -- आज शनिवार ४ मे रोजी, चैत्र कृष्ण एकादशी असून, पूर्वभाद्रपद नक्षत्र आणि ऐंद्र योग आहे. आज चंद्र कुंभ राशीनंतर मीन राशीत संक्रमण करणार आहे. बव करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. परंतु यामुळे कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये. इतरांच्या कामात ढवळाढवळ करणे टाळावे. सामाजिक आणि धार्मिक कामात हातभार लागेल. अनावश्यक खर्च होईल. मनात योजिलेले काम पूर्णत्वास जाईल. चांगली बातमी कानावर पडेल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. प्रकृती थोडी मऊ असेल. अचानक धनलाभ होईल. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल. कोणतेही काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणे फलदायी ठरेल. कोणत्याही क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्...