Mumbai, मे 1 -- आज बुधवार १ मे रोजी, चैत्र कृष्ण अष्टमी असून, श्रवण नक्षत्र आणि शुभ योग आहे. आज चंद्र मकर राशीत संक्रमण करणार आहे. बालव करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

आज मनामध्ये प्रचंड खळबळ राहील. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्येतीची काळजी घ्या. स्वभावानुसार मानसिक चिडचिड दगदग होईल.

आज गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. भावंडांबरोबर वादविव...