Mumbai, फेब्रुवारी 13 -- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : टीव्ही विश्वात सर्वाधिक काळ चाललेल्या व तरीही लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कार्यक्रमांपैकी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा एक प्रमुख शो आहे. २००८ पासून सुरू असलेल्या या शोमधील प्रत्येक पात्रांच्या टीव्ही रसिकांच्या मनात घर केलं आहे. यातील एक पात्र म्हणजे दयाबेन.

दयाबेन हे पात्र साकारणारी दिशा वाकानी तिच्या खास अभिनयामुळं व हसण्याच्या हटके शैलीमुळं लोकांची विशेष आवडती ठरली आहे. मालिकेतील गडगडाटी हसण्यासाठी प्रसिद्ध असलेली दयाबेन स्वत:च्या प्रसूतीच्या वेळी देखील हसत होती. इतकंच नव्हे तर मंत्रोच्चार करत होती.

दिशानं स्वत: एका मुलाखतीत हे सांगितलं होतं. दिशानं मालिकेतून ब्रेक घेतला आहे. ती सध्या आपल्या मुलांना आणि कुटुंबाला वेळ देते आहे. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे.

हेही...