Mumbai, फेब्रुवारी 5 -- Tharala Tar Mag 5 February 2024 Serial Update: 'ठरलं तर मग' या मालिकेत आजच्या भागात अर्जुन सायलीला शिव मंदिरात दर्शन करण्यासाठी घेऊन जाताना दिसणार आहे. सायली मंदिरात जाऊन आपल्या घरातील आणि सुभेदार कुटुंबातील सगळ्यांसाठी काहीना काही मागत आहे. सायलीने प्रत्येकासाठी आनंद मागून आता देवळातून बाहेर पडणार आहे. मात्र, अर्जुन तिला थांबवून पुन्हा मंदिरात जाणर आहे. आपल्याला बाहेर सोडून अर्जुन सर पुन्हा मंदिरात का गेले? या प्रश्नाने सायली वैतागणार आहे. तर, दुसरीकडे अर्जुन मंदिरात जाऊन देवाकडे सायलीसाठी मागणं मागणार आहे.

अर्जुन पुन्हा देवळात जाऊन देवाकडे सायलीसाठी आनंद मागणार आहे. अर्जुन देवळात जाऊन बोलणार आहे की, 'देवा आता तुझ्यासमोर जी मुलगी येऊन गेली, तिने सगळ्यांसाठी आनंद मागितला असेल आणि सगळ्यांची दुःख स्वतःसाठी मागितली अ...