Mumbai, मार्च 14 -- Tharala Tar Mag 14th March 2024 Serial Update: 'ठरलं तर मग' या मालिकेमध्ये आता प्रेक्षकांना एकदा धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. प्रताप सुभेदार यांना अडकवण्याचे काम महिपतनीच केला आहे, हे सायली आणि अर्जुनला आधीपासूनच माहीत होते. मात्र, महिपत विरोधात ठोस पुरावे मिळावेत, म्हणून सायली आणि अर्जुन प्रयत्न करत आहे. या प्रकरणाचा मागोवा घेत असताना अर्जुनला संतोषबद्दल कळले. संतोष हा प्रताप सुभेदार यांच्या औषध कंपनीत कामाला आहे. प्रताप सुभेदारांच्या औषध कंपनीच्या ट्रकमध्ये जेव्हा ड्रग्ज सापडले, त्यावेळी संतोष कामावर होता. संतोषला अर्जुनने महिपतच्या घरातून बाहेर पडताना पाहिले होते. संतोष प्रताप सुभेदारांच्या कंपनीत काम करतो, तर तो महिपतच्या घरी काय करतोय, असा प्रश्न अर्जुनला देखील पडला होता.

प्रताप सुभेदारांच्या गाडीत ड्रग्ज ठे...