Thane, जानेवारी 28 -- Thane city mall fire news : ठाण्यात हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आगीचे लोट दुरवरून दिसून येत आहे. घटनास्थळी आग विझवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी ८ च्या सुमारास ही आग लागली. आगीचे लोट दुरवरून दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आग नेमकी कशी लागली या बाबत माहिती मिळू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार ठाणे घोडबंदर रोडवरील हायपर सिटी मॉलमधील पुमा बूट्सच्या शोरूममध्ये ही आग लागली. ही आग सकाळी ८ च्या सुमारास लागली. दुकानातून आगीचे व धुराचे लोट येत होते. याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली. ठाणे महानगर पालिकेचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा करत...