Thane,Thane Accident News,Thane Man Killed Hit By Train,ठाणे,ठाणे रेल्वे अपघात,रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, फेब्रुवारी 6 -- Thane Train Accident News: ठाण्यात रेल्वे रुळांवर सेल्फी काढताना एक्स्प्रेस ट्रेनने धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली घडली, अशी माहिती कल्याण येथील सरकारी रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने दिली.

साहिर अली असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. साहिर हा ठाण्यातील अंबरनाथ भागात त्याच्या नातेवाईकांना भेटायला आला होता, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली. साहिर हा आपले नातेवाईक आणि मित्रांसह सेल्फी आणि ग्रुप फोटो काढण्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांदरम्यान अस...