भारत, जानेवारी 26 -- Telngana Road Accident: तेलंगाणा राज्यातील वारंगल जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात ७ जणांचा बळी गेला आहे. तेलंगाणामधील वारंगल -मामुनुरु मार्गावर रेल्वे ट्रॅक (railway track) बसवण्याचे काम सुरू आहे. यासाठीवापरले जाणारे लोखंडी रॉड ट्रकमधून नेले जात होते. हे रॉड ऑटो रिक्षावर पडले आहेत. याखाली दबल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात सहा जण गंभीर जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, वारंगल -मामुनूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेलवे ट्रॅकसाठी वापरण्यात येणारे लोखंडी रॉडची वाहतूक करणारा ट्रक महामार्गावरून जात होता. त्याच्या समोर दोन ऑटो रिक्षा जात होत्या. ...