भारत, डिसेंबर 8 -- टीम इंडिया सध्या बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. यानंतर भारताला बांगलादेशमध्येच कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र या मालिकेनंतरही भारतीय संघाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त राहणार आहे. भारतीय संघाचे देशांतर्गत वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. पुढील ३ महिन्यांत तीन देशांचे संघ भारतात येणार आहेत. भारतीय संघ मार्चपर्यंत सातत्याने सामने खेळणार आहे.

श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ भारतात येणार आहेत. या मालिकांचे वेळापत्रक BCCI ने आज (८ डिसेंबर) जाहीर केले आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडचा संघ जानेवारीत भारत दौऱ्यावर येणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारी, मार्चमध्ये भारतात असेल.

श्रीलंकेला भारतात ३ टी-20 आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. तर न्यूझीलंडही ३ वनडे, ३ टी-20 सामने खेळण्यासाठी भारतात येणार...