Mumbai, मार्च 12 -- Gautam Gambhir Travel India A Tour of England : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी २०५ चे विजेतेपद पटकावले . आता टीम इंडिया पुढील दोन महिने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. कारण २२ मार्च ते २५ मे या कालावधीत संपूर्ण भारत IPL २०२५ चा थरार अनुभवणार आहे.

या दरम्यान, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारत अ संघासोबत इंग्लंडला रवाना होणार असल्याची बातमी समोर आली आहे. जून-जुलै महिन्यात भारताला इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

ही मालिका २० जूनपासून सुरु होणार आहे. भारत-इंग्लंड कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी गौतम गंभीर 'भारत अ' संघासह इंग्लंडला भेट देणार आहे. भारत 'अ' संघाला प्रशिक्षक नाही, त्यामुळे गौतम गंभीर 'इंडिया 'अ' संघासोबत केवळ समालोचक म्हणून जाणार की व्हीव्...