Mumbai, फेब्रुवारी 8 -- Tata Punch EV Offers: भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी सातत्याने वाढत आहे. जर तुम्हीही येत्या काही दिवसात नवीन ईव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. खरे तर टाटाच्या धांसू ईव्ही पंच इलेक्ट्रिकवर ग्राहकांना थेट ७० हजार रुपये वाचवता येणार आहेत. दरम्यान, टाटा पंच ईव्हीवर मिळणाऱ्या डिस्काउंट आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या दरम्यान टाटा पंच ईव्हीच्या एमवाय २०२४ वर सर्वाधिक सूट मिळत आहे. ऑटोकार इंडिया या न्यूज वेबसाईटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ग्राहकांना पंच ईव्ही एमवाय २०२४ वर ७० हजार रुपये वाचवण्याची संधी मिळत आहे. तर, एमवाय २०२५ वर ४० हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. डिस्काऊंटबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक आपल्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात.

टाटा पंच ईव्...